सांगलीत खासदार संजयकाका पाटील ह्यांच्या प्रयत्नामुळे , सांगली रेल्वे स्टेशनवर, मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा मंजूर....

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

- मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस आता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणार.

👉 सांगली जिल्हा गुजरात, राजस्थान आणि दिल्ली बरोबर कनेक्ट झाला.

👉 कोटा येथे आयआयटी(IIT) उच्च शिक्षण घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांची विशेष सोय होईल.

सांगलीचे खासदार श्री. संजय काका पाटील यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी रेलमंत्री श्री.अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांना पत्र व्यवहार करून सांगली जिल्हा मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनवर मिरज-निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेस या रेल्वेगाडीचा थांबा मिळवण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांबरोबर दिल्लीमध्ये चर्चा केली व सांगली रेल्वे स्टेशन येथे दर्शन एक्सप्रेस, चंदिगढ-यशवंतपुर संपर्क क्रांति व निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांति या 3 रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली.रेल्वे कृती समिती चे अध्यक्ष मकरंद भाऊ देशपांडे , सांगली रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उमेश शहा, सुकुमार पाटील  यांनी तांत्रिक बाबतीत रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर याबाबतीत पत्रव्यवहार केला.

रेल्वे मंत्र्यांनी खासदार संजय काका पाटील यांची मागणी मान्य करून त्वरित दर्शन एक्सप्रेस या गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर केलेला आहे.दर्शन एक्सप्रेस या गाडीचा सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील असंख्य लोकांची दिल्ली, गुजरात, राजस्थान जाण्यासाठी सोय होणार आहे.

दर्शन एक्सप्रेस रेल्वे गाडी प्रत्येक रविवारी सकाळी 5 वाजता सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून कराड सातारा जेजुरी पुणे लोणावळा कल्याण(मुंबई),  वसई रोड(मुंबई),  वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वरून प्रत्येक शुक्रवारी रात्री 9:40 वाजता सुटून कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी, वसई रोड(मुंबई), कल्याण, मुंबई, लोणावळा पुणे, जेजुरी, सातारा, कराड येथे थांबून सांगली रेल्वे स्टेशनला शनिवारी पहाटे 12:45 ला पोहोचेल.

विशेषतः सांगली जिल्ह्यातील जे विद्यार्थी  आयआयटी(IIT) उच्च शिक्षण घेण्यासाठी कोटा येथील शिक्षण संस्थांमध्ये शिकत आहेत. त्या विद्यार्थ्यांना सांगली रेल्वे स्टेशन वरून थेट कोटा येथे जाण्यासाठी रेल्वे गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाने खासदार संजय काका पाटील यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top