जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरात यंदाच्या वर्षी आगामी गणेशोत्सवाच्या काळात, साऊंड सिस्टिम चालकांनी, आवाजाची मर्यादा पाळून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा 1 दिवस तुमचा असला तरी 364 दिवस आमचे आहेत असा निर्वाणीचा इशारा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे. कोल्हापुरातील अलंकार हॉलमध्ये यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या साठी, व्यवसायिक व पोलीस अधिकारी यांची एक संयुक्त बैठक झाली.त्यावेळी सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे नियम पाळून, कोल्हापूर पोलीस जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी लेझर शोवरही बंदी राहणार असल्याचे स्पष्ट करून, यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात साऊंड सिस्टिम चालकाने, आवाजाची मर्यादा पाळून,पोलीस प्रशासनाशी सहकार्य करावे. आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये,शिवाय पोलिसांशी कटूताही घेऊ नये असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या काळात लेझर शोला बंदी असणार असल्याचे स्पष्ट करून, लेझर शोमुळे जर वाईट दुर्घटना घडली तर, याला जबाबदार कोण? असा प्रतिप्रश्न करून,कोणत्याही परिस्थितीत लेझर शो ला बंदी असणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत, साऊंड सिस्टिम ची जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी आवाजाची पातळी तपासून,जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर कडक आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत, कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले.