महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण उद्या सांगली दौऱ्यावर. ----

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते आमदार श्री. अशोकराव चव्हाण हे गुरुवार, दि.१७ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक विकास कामांचे उदघाटन होणार असल्याची माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 ते म्हणाले, गुरुवारी दुपारी ३.०० वाजता श्री.चव्हाण यांचे कोल्हापूरहून सांगली येथे आगमन होणार आहे. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित युवा संपर्क अभियान मतदार नोदणी व दुरुस्ती फक्त एक मिस कॉल द्वारे या कार्यक्रमाचे शुभारंभ होणार आहे. दुपारी ३.३० वाजता लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन स्टेशन चौकात सांगली येथे श्री. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

४.०० वाजता मार्केट यार्डमध्ये विष्णूअण्णा पाटील खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचे आणि कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ४.३० वाजता विष्णूअण्णा पाटील खरेदी विक्री संघातच त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

सायंकाळी ५.१५ वाजता प्रभाग क्रमांक ११ मध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उदघाटन तसेच विविध रस्त्यांच्या कामाचे उदघाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता कर्नाळ येथे नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन तसेच रिंग रोड आणि विविध विकास कामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ९.०० वाजता श्री.चव्हाण हे कडेगावला रवाना होणार आहेत,असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top