जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील तालुक्यात पाण्याविना कोणीही वंचित राहू नये, शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे,यासाठी मी प्रयत्नशील आहे त्याकरता केलेल्या पाहणीद्वारे प्रशासनाशी समन्वय साधून, या योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तत्पर आहे,असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केले.
खासदार संजयकाका पाटील यांनी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याद्वारे,शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन टेंभू व म्हैशाळ योजनेच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन संवाद साधला त्यावेळी विविध ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,टेंभू आणि म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचा दुसरा पाहणी दौरा दि. 25 ऑगस्ट २०२३ रोजी केला. या दौऱ्यादरम्यान टेंभू आणि म्हैशाळ योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणि चालू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाणी केली व चालू सिंचना संदर्भात आढावा घेतला तसेच नागरिकांच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपायोजनांचा अभ्यास केला व त्या अनुषंगाने उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या दौऱ्या दरम्यान बंडगरवाडी,म्हैसाळ(एम),नांगोळे, इरळी,लंगरपेठ, आरेवाडी, केरेवाडी,शेळकेवाडी,आगळगाव (शेळकेवाडी तलाव),कुची मार्गे जाखापूर (तलाव व बंधारे), कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी,घाटनांद्रे या गावांना भेट देऊन दुर्गम भागात चालू असलेल्या सिंचन योजनांचा आढावा घेतला तसेच शेळकेवाडी येथे बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना चालू योजना बद्दल माहिती दिली.
यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख श्री .प्रभाकर पाटील यांचे सह शेतकरी बांधव, नागरिक, सरपंच,उपसरपंच,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दौऱ्यादरम्यान प्रशासनाला तात्काळ माहिती देऊन तात्काळ याची बद्दल उपाययोजना होण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही सोबत होते. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब ,टेंभू व्यवस्थापन समितीचे राजेंद्र रेड्डीयार, ताकारी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता राहुल कोरे यांसह त्यांचा स्टाफ व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या.चालू सिंचन योजनांबाबत शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.खासदार संजयकाका पाटील यांच्या दौऱ्यामध्ये त्यांचे पुत्र युवा नेते प्रभाकरबाबा पाटील हिरेरीने सहभागी झाले होते. काही युवा नेते राज्याच्या नेतृत्वाची स्वप्ने पाहतात व राज्यभर दौरे करण्यासाठी बाहेर फिरत असतात, आणि मतदारसंघात दुर्लक्ष करतात, मात्र खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र मात्र जनतेच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे चित्र पाहून अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.