जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय उद्योगपती गौतम अदानींच्या कंपन्यांत चिनी व्यक्तीची गुंतवणूक असल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी,काँग्रेसचे नेते राहुल गांधी व त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचे आगमन झाले,त्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेतलेल्या परिषदेमध्ये त्यांनी वरील आरोप केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतीत चौकशी का करत नाही? गप्प का आहेत? असा प्रतिप्रश्नही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय दोन वृत्तपत्रांनी अदानी कंपन्यांच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले असून, अदानी कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढवण्यासाठी विदेशातील पैसा,अदानींच्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवणूक केला गेला आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या प्रकरणांची संसदीय संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान अदानींच्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव वाढवून,त्या पैशातूनच अदांनी आहेत यांनी देशातील विमानतळे,सिमेंट कंपन्या, संरक्षण प्रकल्प,बंदरे,प्रकल्प आदी ठिकाणी पैसा गुंतवून, पैसा वापरला जात आहे. हा सर्व पैसा कोणाचा आहे? असा प्रतिप्रश्नही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची मालकी कोणाची?असा प्रश्न करून,या सर्व प्रकरणाची संसदेची संयुक्त समिती स्थापन करून चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स आज 4.5 टक्क्यानी गडगडले आहेत.शेअर बाजारात देखील,याबाबतीत यापुढे पडसाद उमटत राहतील अशी शक्यता आहे.