कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ व महसूल दिनानिमित्त सलोखा योजनेचा प्रारंभ समारंभ संपन्न .--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

हातकणंगले दुय्यम निबंधक वर्ग १ येथे सलोखा योजने अंतर्गत पहिला दस्त नोंदवून सपूर्द करतांना मान्यवर.

कोल्हापूर जिल्ह्यात महसुल दिनाचे औचित्य साधून हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ या कार्यालयाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.

हातकणंगले येथील दुय्यम निबंधक वर्ग १ काळेसो यांच्या उपस्थितीत महसूल दिनानिमित शासनाच्या सलोखा योजना अंतर्गत पहिला दस्त नोंदवून लाभार्थांना सपूर्द करण्यात आला. तसेच तालुक्यातील इत्तर लाभार्थ्यांना या सलोखा योजनेसंदर्भांत माहिती देण्यात आली. व या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन दुय्यम निबंधक काळेसो यांनी केले.

यावेळी तहसिलदार कल्पना ढवळे ,भुमिअभिलेख अधिक्षक सुवर्णा मसणे, क्लार्क शिवाजी पाटील, शंकर यादव, संगणक ऑपरेटर उत्तम पाटील, साहिल सय्यद , वकिल वर्ग, स्टॅम्प रायटर, पक्षकार व मुद्रांक विक्रते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top