जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय उद्योग जगताचे सम्राट रतन टाटा यांना,महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार,आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,सन्मानपूर्वक गौरव करून प्रदान केला.भारतीय जगताचे उद्योग सम्राट रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यामुळे,राज्याच्या उद्योग रत्न पुरस्काराची शान आणि उंची वाढली असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्याबरोबरच ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,राज्यातील उद्योग व विकास प्रकल्पाविषयी चर्चा केली.
महाराष्ट्र राज्य शासनाने यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सारखा राज्य शासनाच्या वतीने,राज्याचा उद्योग रत्न पुरस्कार देणे सुरू केले आहे .दरम्यान सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना उद्योग मित्र पुरस्कार ,किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार व उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला असून, आज मुंबईत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते समारंभ पूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे उद्योग मित्र पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार, व मराठी उद्योजक पुरस्कार,यामध्ये रोख रक्कम सन्मानचिन्ह व मानपत्र आदीचा समावेश आहे.