जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य सरकारने वाढीव दराने दूध खरेदी बाबत अर्थसहाय्य करावे अशी मागणी ,पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने, सध्या गाईच्या दूध खरेदीदरात 2 रुपये प्रति लिटरने वाढ करून 34 रुपये दर प्रति लिटर 21 जुलैपासून लागू केला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शासन निर्णयानुसार, 21 जुलैपासून वाढीव 2 रुपये प्रति लिटर दूध खरेदीचा दर हा परवडणारा नसून, त्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य करावे अशी मागणी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने केली असून, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णययाची, कात्रज दूध डेअरी संघानं अंमलबजावणी पण सुरू केली आहे, पण त्यामुळे दूध संघाला दररोज 3.50 लाख रुपयांचा तोटा होत असून, हा तोटा भरून काढणे दूध संघाला आवाक्याबाहेर जाण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे, शासनाचा वाढीव दूध खरेदीचा दर बंधनकारक करू नये, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील अन्य इतर संघांना देखील सदर शासनाचा निर्णय परवडणारा नसून,शिवाय दूध संघांना यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील दूध संघ, या शासनाच्या वाढीव दूध दर खरेदीच्या निर्णयामुळे, अडचणीत येण्याची शक्यता आहेत.