जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूरच्या कायदा सल्लागारपदी ऍड. प्रदीप महादेव पाटील (रा.येवलुज ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र केडीसीच्या लवाद विभाग व्यवस्थापक यांनी दिले आहे. त्यांच्या या निवडीमध्ये ऍड.अरुण पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे मित्रपरिवार व नातेवाईकातून अभिनंदन केले जात आहे.