जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
अमरावती येथील सभेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी एका धारकर्याला एका पुस्तकातील म. गांधी यांच्या संदर्भातील एका मजकूर वाचण्यास सांगितला. यावरून सध्या काँग्रेस, डावे, पुरोगामी हे अकारण ऋषीतुल्य अशा पू. भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करून,अश्लाघ्य शब्दात त्यांच्यावर टीका करत आहेत. वास्तविक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी अमरावती येथील सभेत जो मजकूर वाचण्यास सांगितला तो अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकाच्या आधारे आणि प्रा. के. एस.स. नारायणाचार्य यांच्या पुस्तकातील आहे. ‘द कुराण अँड द काफीर’ पुस्तक वर्ष 1983 मध्ये प्रकाशित झाले आहे. अमिताव घोष यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 16 वे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. 192 पानांच्या या पुस्तकात 106 क्रमांकाच्या पानावर गांधींच्या जन्माच्या संदर्भातील उल्लेख आहे. याच समवेत एकूणच गांधींनी अंधपणे केलेले मुसलमानांचे लांगूलचालन, मुसलमानांच्या गुन्ह्यांचे केलेले समर्थन आणि हिंदूंशी केलेला भेदभाव यावर त्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. त्यामुळे ज्या पुस्तकावर बंदी नाही अशा पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे हा गुन्हा कसा होऊ शकेल.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी लाखो तरुणांना धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यास प्रवृत्त केले, तसेच युवकांना संघटित करून त्यांना दिशा देण्याचे अतुलनीय कार्य केले आहे. आजपर्यंत गडकोट मोहीम, शिवराज्यभिषेक दिन, रायगड येथील छत्रपतींच्या समाधीची नित्य पूजा, दुर्गामाता दौड यांसह अनेक उपक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने राबवण्यात येतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अत्यंत अयोग्य भाषेचा उपयोग केला होता. त्या वेळेस त्यांच्यावर गुन्हा का नोंदवण्यात आला नाही ? पू. भिडेगुरुजी यांच्या सर्वत्र होणार्या सभा या शांततेत चालू असतांना त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक समाजात अशांतता पसवणार्या हा डाव आहे. तरी या मागे असलेल्या षडयंत्राचा शोध घेणे आवश्यक आहे.
वामन मेश्राम यांनी यापूर्वी जाहीर सभांमधून म. गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे, तसेच म. गांधी यांची समाधी बुलडोझर लावून तोडण्याची भाषा केली आहे, त्यांच्याविरोधात आजपर्यंत कारवाई करण्याची मागणी पुरोगामी, डावे, काँग्रेसवाले यांनी का केली नाही ? त्या वेळी हे सर्व मूग गिळून गप्प का बसले होते, यावरून त्यांचा दुतोंडीपणा लक्षात येतो.
सोलापूर येथे 2 ऑगस्ट या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची परवानगी घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते; मात्र पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर 3 ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ सर्व कार्यकर्ते जमले असता त्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन फौजदारी कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. या कार्यकर्त्याना ताब्यात का घेतले ? हे विचारण्यासाठी इतर हिंदुत्वनिष्ठ पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्यांच्यावर लाठीमार केला. मुळात या कार्यकर्त्यांनी कोणतीही हुज्जत अथवा कोणताही अनुचित प्रकार केला नाही. तरीही पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे काही कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच या ठिकाणी आलेल्या एका माजी नगरसेवकाची कॉलरही पोलिसांनी पकडली. तरी या प्रकरणी धारकर्यांना अमानुष मारहाण करणार्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करावे, अशी आमची मागणी आहे. कालच या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ‘एका व्यक्तीच्या विरोधातच याचिका का? ’ असा प्रश्न विचारून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळ्याच्या सूचना केल्या आहेत. ही एकप्रकारे सर्व विरोधकांना चपराकच आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही मागण्या करतो की.....
१. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणार्या आणि विधानसभेत चुकीची मागणी करणार्या आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर, तसेच पू. भिडेगुरुजी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणार्या मंत्री छगन भुजबळ त्यांच्यावरही गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी या आमदारांना निलंबित करावे.
२. राज्यभरात अनेक ठिकाणी होणार्या आंदोलनांमध्ये पू. भिडेगुरुजी यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात येत आहे. तरी पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात जिथे जिथे आंदोलन करण्यात आले. त्यामागे कोण होते याचा शोध घेऊन त्या प्रत्येक ठिकाणी सामाजिक अशांतता बिघडवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत. कोल्हापूर येथेही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पू. भिडेगुरुजी यांच्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली होती. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
३. सोशल मिडियाद्वारेही पू. भिडेगुरुजी यांच्यावर वारंवार चिखलफेक करण्याचा प्रकार होत आहे. तरी अशा लोकांना शोधून काढून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी.