जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली दि.17 सप्टेंबर 2023 वार रविवार रोजी,मराठा समाज बांधवांकडून," विशाल मराठा क्रांती मोर्चा" आयोजित केला असून,आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या व इतर मागण्यांसाठी,हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. सांगलीतील निघणाऱ्या दि.17 सप्टेंबर 2023 रोजीच्या मोर्चाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून सकाळी 10:00 वाजता होणार असून, राम मंदिर चौकात मोर्चाची सांगता होणार आहे.
सांगलीतील मराठा समाज बांधवांनी,आपल्या आरक्षणाच्या व इतर मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, विशाल मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले आहे. सदरहू निघणाऱ्या "विशाल मराठा क्रांती मोर्चास",उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी, पाणी पिण्याची व अल्पोपोहाराची व्यवस्था, लिंगायत बोर्डिंग सांगलीतर्फे करण्यात आली आहे, तसेच "विशाल मराठा क्रांती मोर्चाच्या "सांगतेनंतर, शहरातील मोर्चाच्या रस्त्यावरील सर्व ठिकाणची स्वच्छता,सांगली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात येणार आहे.
जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, विनायक शेटे, संदीप पाटील, विजय पाटील सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित राहणार आहेत. सांगली लिंगायत बोर्डिंग चे पदाधिकारी अशोक पाटील,सुशील हरदरे, सुनील कोरे,विनायक शेटे,योगेश कापसे,सतीश मगदूम, सचिन घेवारे,रमेश दडगे आणि लिंगायत समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
"विशाल मराठा क्रांती मोर्चा"स पाठिंबा.-
17 सप्टेंबर 2023 रोजी निघणाऱ्या" विशाल मराठी क्रांती मोर्चास" खासदार संजय काका पाटील,आमदार सुधीर दादा गाडगीळ, सत्यजित देशमुख, दीपक बाबा शिंदे,माजी आमदार नितीन शिंदे आदींनी पाठिंबा दिला असून,उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) जिल्हाप्रमुख संजय विभुते ,शंभूराज काटकर, ऋषिकेश पाटील, सुरेश साखळकर,बजरंग पाटील, रुपेश मोकाशी आदींनी तसेच शिवसेना सांगली (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे,आनंदराव पवार व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी निघणाऱ्या "विशाल मराठा क्रांती मोर्चास" पाठिंबा दिला आहे.
दि.17 सप्टेंबर 2023 वार रविवार रोजी निघणाऱ्या विशाल मराठा समाज क्रांती मोर्चास,सांगली जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी व सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन,मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक नितीन चव्हाण, सतीश साखळकर,राजेंद्र जगदाळे,प्रकाश जगताप आदींनी केले आहे.