जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
यंदाच्या वर्षीची गणेश चतुर्थी ही मंगळवार अंगारक योगावर 19 सप्टेंबर 2023 रोजी असल्याचे प्रसिद्ध पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे. काही ज्योतिषांनी सूर्य सिद्धांत ग्रंथानुसार,गणित करून स्थूल रीतीने सांगितले आहे.त्यामुळे गणेश चतुर्थी विषयी संभ्रम निर्माण केला गेला आहे. त्या ज्योतिषांनी पंचांग चुकीच्या गणितावर केलेले आहे.त्यामुळे त्यां ज्योतिषांनी दिलेल्या तृतीया समाप्तीची वेळ दि.18 सप्टेंबरला 2023 ला सकाळी 10 वाजून 53 मिनिटाला आहे.
परंतु आम्हा सर्व पंचांग कर्तेंच्या निर्णयानुसार,आमच्या पंचांगाप्रमाणे ती दि.18 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 38 मिनिटाला आहे व मंगळवार दि.19 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थी दुपारी 1 वाजून 45 मिनिटाला संपत असून मंगळवार अंगारक योगावर दि.19 सप्टेंबर 23 ला, गणेश चतुर्थी मध्यान्हाला येत आहे.19 सप्टेंबर 2023 ला गणेश चतुर्थी ही अगदी बरोबर आहे.आम्ही सर्व म्हणजे निर्णय सागर, दाते पंचांग,कालनिर्णय,लाटकर पंचांग,राजंदेकर पंचांग, रुईकर पंचांग आदी सर्व पंचांगामध्ये,दि.19 सप्टेंबर 2023 ला श्री गणेश चतुर्थी असल्याचा उल्लेख केला आहे,व तो अगदी तंतोतंत बरोबर आहे,असे पंचांग कर्ते सोमण,दाते, साळगावकर,राजंदेकर,लाटकर,यांनी सांगितले आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीची गणेश चतुर्थी चे पार्थिव पूजन व श्री गणेश प्रतिष्ठापना ही दि.19 सप्टेंबर 2023 रोजी आहे. सर्वत्र यंदाच्या वर्षीचे गणेश चतुर्थीचे पार्थिव पूजन, श्री गणेश प्रतिष्ठापना ही अंगारक योगावर मंगळवार दि.19 सप्टेंबर 2023 रोजी करावी असे सर्व पंचांग कर्ते यानी सांगितले आहे.