जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे जिल्हा व शहर काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे प्रभाग क्रमांक 28 मधील रहिवाशांसाठी,फक्त रुपये 5 प्रति गणेश मूर्तीसाठी,याप्रमाणे 555 मूर्तींच्या वाटप करण्याच्या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ,माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.पुणे जिल्हा व शहर काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या वतीने गेले 5 वर्षापासून हा उपक्रम प्रभाग क्रमांक 28 मधील रहिवाशांसाठी राबवण्यात येत असून,फक्त 5 रुपये प्रति गणेश मूर्ती साठी आकारून,555 लोकांना श्री गणेश मूर्ती दिल्या जातात.नुकत्याच झालेल्या जिल्हा व शहर काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या कार्यक्रमात,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एडवोकेट अभयजी छाजेड,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे,पुणे शहर जिल्हा व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत ब.सुराणा,पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस योगिता भरत सुराणा आदी मान्यवर पदाधिकारी,काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक 28 मधील रहिवाशी नागरिक उपस्थित होते. पुणे जिल्हा व शहर काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या वतीने गेली पाच वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत असून,दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा प्रभाग क्रमांक 28 मधील रहिवाशांसाठी,रुपये 5 प्रति मूर्ती त्याप्रमाणे 555 श्री गणेश मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे.