जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने संसदेचे 5 दिवसीय विशेष अधिवेशन,दि.18 सप्टेंबर 2023 पासून 22 सप्टेंबर 2023 पर्यंत बोलावले असून, या अधिवेशनात "एक देश एक निवडणूक"याच्या संबंधी एक विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जी- 20 शिखर परिषदेनंतर, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज दिली.संसदेच्या विशेष अधिवेशना जवळपास 5 बैठका होणार असून, सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले आहे? याचा कोणताही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे,मुदतपूर्व निवडणुका होण्याच्या शक्यतेच्या चर्चेला देखील आधार मिळत असल्याचे दिसते.
दरम्यान होणाऱ्या संसदेच्या 5 दिवसीय विशेष अधिवेशनामध्ये,अंदाजे 10हून अधिक विधेयक सादर केली जाण्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.त्यासाठीच हे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याच्या चर्चेला सुद्धा रंग आला आहे. दरम्यान गेले काही दिवस देशात चालू असलेल्या" एक देश एक निवडणूक" याच्या चर्चेसंबंधी देखील संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मते आजमावली जातील असे वाटते. एकंदरीतच केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष 5 दिवसीय अधिवेशनामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला रंग आला असून संसदेच्या विशेष अधिवेशन बोलण्याच्या मागचा उद्देश काय आहे? याविषयी संदिग्धता कायम आहे.