जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशात यंदाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी 91 ते 109 टक्के पाऊसमान राहण्याचा अंदाज,भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून,त्यामध्ये सरासरीपेक्षा 9 ते 10 टक्के पाऊस हा कमीच राहणार असल्याचा अंदाज,हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी दिली. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये तापमानात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,ऑगस्ट महिन्यातील यंदाच्या वर्षीचा पाऊस हा, गेल्या 100 वर्षातील निश्चांकी पातळीवर असल्याचे, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
दरम्यान यंदाच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हा 91 ते 109 टक्के जरी असला तरी,देशातील सर्वच भागात हा पाऊस पडेल असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.त्याबरोबरच हवामानात देखील देशातील बहुतेक ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील मध्य भागात तापमान वाढ होणार असून,उत्तर भागात मात्र तापमान वाढीची शक्यता कमी आहे .दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस सप्टेंबर महिन्यात 94 ते 96 टक्के पडेल असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितला असून, त्यामध्ये 10 टक्के पाऊसमान कमी- जास्त राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील यंदाच्या वर्षीचे पाऊसमान कसे असेल? याबाबतीत आज हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सविस्तर तपशीलवार माहिती दिली.