सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व जिल्ह्याच्या वतीने, देशातील भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी स्थापन केलेल्या "इंडिया" आघाडीच्या समर्थनार्थ पाठिंबा कार्यक्रम संपन्न.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

देशात भाजपा विरोधी सर्व पक्षांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडी ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या  वतीने आज समर्थन दर्शवण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब,सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पुढाकाराने समर्थन करण्यात आले.

इंडिया आघाडीची राष्ट्रीय पातळीवरची तिसरी बैठक मुंबई येथे संपन्न होत आहे, या पार्श्वभूमीवर सांगली मध्ये आज इंडिया आघाडी च्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून पाठींबा देण्यात आला, गेले नऊ वर्ष भाजपा सरकार कार्यकाळात संपूर्ण देशामध्ये महागाई,बेरोजगारी,महिला अत्याचार व जातीवाद या सारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत,परंतू या सर्व प्रश्नांकडे सध्याचे सत्तेतील भाजपा सरकार दुर्लक्ष करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये सर्व जनताच अशा सरकारला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही, अशा भावना पदाधिकाऱ्यानी व्यक्त केल्या.

यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, मा.नगरसेवक विष्णू माने,हरिदास पाटील,सांगली शहर महिला अध्यक्षा अनिता पांगम,मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे, विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा छाया जाधव,उत्तम कांबळे, युवराज गायकवाड,आयुब बारगिर,डॉ.शुभम जाधव,महालिंग हेगडे,अर्जुन कांबळे,संदीप व्हनमाने, विद्या कांबळे, अमृता चोपडे,संगीता जाधव,सुरेखा सातपुते,रुपाली कारंडे,सुनीता जगधने,रामभाऊ पाटील,फिरोज मुल्ला,भीमराव बेंगलोरे, प्रकाश सुर्यवंशी,प्रकाश मदने,अरुण चव्हाण,आप्पासो ढोले,  सचिन सगरे,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top