जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी मंत्री सौ पंकजा मुंडे- पालवे या आज आल्या होत्या."कोणाला काही अल्प पडू नये"कोणी उपाशी राहू नये""आपल्या द्वारात कोणी आला, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये" अशी प्रार्थना आपण श्री महालक्ष्मीदेवीकडे केली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली.सौ.पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा चालू केली आहे.
कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या प्रसंगी शिवसेना खासदार धैर्यशील माने, महेश जाधव, राजवर्धन निंबाळकर यांसह अन्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगलीत प्रसिद्ध असलेल्या श्री. गणेश मंदिरात,भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे ह्या श्रीगणेशाचे दर्शन घेताना,सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री गणेश मंदिराचे पुजारी श्रीयुत रमेश पाटणकर हे यावेळी उपस्थित होते.