जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत मराठा समाज बांधवांच्यावतीने काढण्यात आलेल्या,मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या,विशाल मराठा क्रांती मोर्चाचे भगवे वादळ पहावयास मिळाले असून,मराठा समाज बांधवांच्या मोर्चाच्या वतीने कुमारी अंजली दीपक सावंत,कुमारी चैत्राली धनंजय वाघ,कुमार राजवीर अमोल सूर्यवंशी, कुमार कार्तिक राहुल पाटील, कुमार ईशान विजय धुमाळ व कुमारी श्रावणी सतीश साखळकर या बाल प्रतिनिधींनी मराठा समाज बांधवांच्या वतीने,सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
मराठा समाजाच्या निघालेल्या मोर्चात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे,खासदार संजय काका पाटील,माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ,शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे शेखर इनामदार, धीरज सूर्यवंशी तसेच मराठा समाजाच्या विशाल मराठा क्रांती मोर्चा पाठिंबा दिलेले संघटनांचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, सांगलीतील सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते.
मराठा समाजाचा विशाल मराठा क्रांती मोर्चा राम मंदिर चौकात आल्यानंतर,मोर्चाच्या लहान मुलांच्या प्रतिनिधींनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन,जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना एक आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सदरहू निघालेल्या "विशाल मराठा क्रांती मोर्चास",उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी,पाणी पिण्याची व अल्पोपोहाराची व्यवस्था,लिंगायत बोर्डिंग सांगलीतर्फे करण्यात आली होती,तसेच "विशाल मराठा क्रांती मोर्चाच्या "सांगतेनंतर, शहरातील मोर्चाच्या रस्त्यावरील सर्व ठिकाणची स्वच्छता,सांगली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात आली होती. विश्रामबाग मधीलमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून ते राम मंदिर चौकापर्यंत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेषतः तत्काळ स्वच्छता केली.एकंदरीतच मराठा समाजाच्या निघालेल्या विशाल मराठा क्रांती मोर्चास सर्वचस्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मोर्चातील उपस्थित असणाऱ्या समाज बांधवांची लाखोंची संख्या लक्षवेधी ठरली आहे.