कोल्हापुरात नैसर्गिक जलक्षेत्रात,श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आठकाडी आणू नये !- - समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापूरात गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन, कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ लावून,श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते,तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते.‘बॅरिकेटस्’ लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी करणे ही भाविकांवर बळजोरी आहे.तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी आडमुठी भूमिका घेत,विसर्जनाविषयी कोणतीही ठोस भूमिका न घेता,प्रशासन शासनाच्या आदेशाप्रमाणेच कृती करेल,असे सांगितले.या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विविध नाल्यांद्वारे होणारे प्रदूषण यांसदर्भात छायाचित्र आणि व्हिडिओ दाखवल्यावर या संदर्भात प्रशासानाची भूमिका विचारल्यावर, हा विषय वेगळा असल्याचे सांगून, जिल्हाधिकार्‍यांनी प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वनिष्ठांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना उत्तरे न देता, जिल्हाधिकार्‍यांनी सोयीची भूमिका घेतली. 

१५ सप्टेंबरला नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती द्यावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,शिवसेना,हिंदु महासभा,हिंदू एकता आंदोलन,विश्‍व हिंदु परिषद,हिंदु जनजागृती समिती यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.त्या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी वरील भूमिका घेतली. 

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री.राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख श्री.मनोहर सोरप आणि श्री.राजू तोरस्कर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.उदय भोसले, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री.विजय पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री.आशिष लोखंडे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे उपस्थित होते.

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या-

1. गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेटस् लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी करते. तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे,त्यांना ते करू देण्यात यावे.

2. कोल्हापूर येथे बाजारात कागदी लगद्याच्या श्रीगणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध होत आहेत,त्यांच्या विक्रीवर ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशाचा स्वीकार करून बंदी घालावी.

3. जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top