जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या नरिमन पॉईंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये, कोल्हापूर जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण पश्चिम संयोजक अध्यक्षपदी सौ. रेखा मिलिंद नांगरे- पाटील यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत,नरिमन पॉईंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात एक बैठक संपन्न होऊन, त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम संयोजक अध्यक्षपदी रेखा मिलिंद नांगरे- पाटील यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी,भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ.रेखा मिलिंद नांगरे- पाटील यांनी आज पर्यंत केलेल्या पक्षासाठी,सर्वसामान्यांसाठी, तळागाळातल्या वर्गासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन, त्यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभाग ग्रामीण पश्चिम संयोजक अध्यक्षपदी म्हणून निवड केली आहे.
नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील नरिमन पॉईंट वरील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात,प्रदेश महामंत्री विजय चौधरी,प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे,भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे प्रदेश संयोजक गणेश काका जगताप,सहसंयोजक राजीव शर्मा, अंकुश देशमुख, प्रसाद कुलकर्णी,प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड, वैशालीताई नांगरे, उमाताई तायडे तसेच सर्व विभाग व जिल्हा व मंडल संयोजक उपस्थित होते. कोल्हापूर भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या जिल्हा ग्रामीण पश्चिम संयोजक अध्यक्षपदी सौ.रेखा मिलिंद नांगरे - पाटील यांची निवड होताच, त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होऊन, सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.