जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात काल ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सूनक व त्यांच्या पत्नी सौ.अक्षता मूर्ती हे दर्शनासाठी आले होते.स्वामीनारायण मंदिराचे मुख्य पुजारींनी,ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक व त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचे स्वागत करून,त्यांच्याकडून षोडशोपचारे पूजा विधी करून घेतला.काल ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक व त्यांच्या पत्नी सौ.अक्षता मूर्ती या जवळपास षोडशोपचारे पूजा विधीसाठी 45 मिनिटे मंदिरात होते.विश्वातले सर्वात मोठे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराची,26 डिसेंबर 2007 रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.दिल्लीतील स्वामीनारायण मंदिर एक अनोख्या संस्कृतीचे अलौकिक दर्शनीय क्षेत्र आहे. दिल्लीतील अनोख्या संस्कृतीचे असलेले अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर हे,गुलाबी-पांढऱ्या संगमरवरी फरशीमध्ये व वाळू च्या दगडापासून बनवले गेलेले,अति प्राचीन कलाकुसरीचे मंदिर होय.
दिल्लीतील अक्षरधाम मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेस अप्रतिम निसर्गरम्य कारंजाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो.दिल्लीतील अक्षरधाम मंदिर सकाळी 5:00 वाजल्यापासून रात्री 9:00 वाजेपर्यंत दर्शनासाठी भक्त भाविकांना उपलब्ध असते.काल ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक व त्यांच्या पत्नी सौ.अक्षता मूर्ती यांनी मंदिरास भेट देऊन,मंदिराचा इतिहास जाणून घेतला.स्वामीनारायण मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी षोडशोपचारे,ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक व त्यांच्या पत्नी सौ.अक्षता मूर्ती यांच्याकडून पूजा विधि करून घेतला.