जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
( प्रतिनिधी - अजित निंबाळकर)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कोल्हापूरचे सुशांत पोवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर,महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर वरक आणि सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सिमंतिनी मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत पोवार यांना नियुक्ती पत्र देऊन पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
सुशांत पोवार यांनी आत्तापर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील अनुभव आहे.यापुर्वी त्यांनी पत्रकारितेतून महाराष्ट्रातील ज्वलंत विषय जैव वैद्यकीय कचरा संकलन व निर्मूलन विषयात सडेतोड लिखाण करून पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनास कारवाईस भाग पाडले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. तसेच सुशांत पोवार यांचा पत्रकारितेतून सर्व शासकीय अधिकारी तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मोठा संपर्क असल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध शासकीय अधिकारी व कोल्हापूर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन करुन भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.