जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य शासनाने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने,आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभा करण्याचा निर्णय घेतला असून,त्यासाठी गणपती पंचायतनमार्फत आवश्यक ती जागा,लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयास देण्याची घोषणा,श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केली आहे. आज ते सांगली येथे श्री गणपती पंचायतन संस्थांनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या,श्री गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापना प्रसंगी बोलत होते.संपूर्ण विश्वात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव असून,त्यांचे बालपण संपूर्ण सांगलीत गेले आहे.त्यामुळे लता मंगेशकर कुटुंबीयांची नाळ सांगली शहराशी जोडली असून, त्यासाठी त्यांच्या नावे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयास,आवश्यक असलेल्या जागेची मदत,श्री गणपती पंचायतन संस्थांनच्यामार्फत आम्ही करू असे अस्वस्थ श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनास,सांगलीत जागेचा प्रश्न आला तर आम्ही,लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयास निश्चितच जागा देऊन सहकार्य करू. त्यामुळे संगीत शिक्षणा बरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश त्यामध्ये करावा अशी इच्छा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
सांगलीतील लता मंगेशकर यांच्या नावाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयामुळे ,सांगलीचे नाव या जगाच्या नकाशावर येईल ही एक निश्चितच सांगलीच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असेल. सांगलीत उभारल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे,ही रास्त अपेक्षाही श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी बोलून दाखवली.