जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ कणेरी हे नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमासाठी कायमच प्रसिद्ध असते त्यातच आता वाढत चाललेल्या प्रदूषणावर मात म्हणून होऊ घातलेल्या गणेश उत्सवासाठी आपल्याला पर्यावरणीय गोमय पदार्थापासून बनवलेल्या सुबक अशा गणेश मूर्ती जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून दिल्या.
कणेरी येथील सिद्धगिरी गुरुकुलम च्या विद्यार्थ्यांनी गाईंच्या गोमय ( गाईंच्या शेणापासून ) आणि कोंड्यापासून व नैसर्गिक रंग यापासून सुबक मूर्ती साकारलेल्या आहेत या मूर्तीपासून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,तसेच याच्या विसर्जनानंतर निसर्गाला फायदा होणार आहे, त्याचा आपण खत म्हणून वापर करू शकतो असे सिद्धगिरी गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे खूप कौतुक केले याप्रसंगी पूज्यपाद कुमार स्वामीजी,यशोवर्धन बारामतीकर श्री विवेक सिद्ध,सागर गोसावी,डॉ.विशाल खलाटे,श्री सिद्धेश कांबळे आणि गुरुकुल चे विद्यार्थी उपस्थित होते.