जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(प्रतिनिधी:अनिल जोशी)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी, जालन्यामध्ये चालू असलेल्या आंदोलना दरम्यान, आंदोलकांच्यावर लाठीहल्ला केल्या प्रकरणी,पोलिसांच्या वर कारवाई करण्यात यावी,अशा व इतर मागण्यासाठी उद्या दि.7 सप्टेंबर 2023 वार गुरुवार रोजी,जिल्हा बंद व रस्ता रोकोचे आंदोलन करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक होऊन,आपल्या रास्त मागण्या मान्य करून घेण्यासाठी व मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी,उद्या सांगली जिल्हा बंदचे व रस्ता रोकोचे आंदोलन करण्यात येणार आहे.केंद्र सरकार मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही,मात्र इतर राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही अशाप्रकारे आरक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. त्यासाठी मोठा लढा उभारून मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी मंत्री अजित घोरपडे यांनी आंदोलनात सर्व शक्तीनिशी उतरूया, तालुका निहाय बैठका घेऊन, आंदोलन यशस्वी करूया असे आवाहन केले आहे, तसेच जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे लागेल असे राज्याचे माजी मंत्री अजित घोरपडे यांनी सांगितले. राज्यातील सध्याच्या मराठा आंदोलनाच्या स्थितीने मराठा आरक्षणाचा मुद्दा फारच गाजत आहे. राज्यातील सर्वच ठिकाणी आंदोलने निषेध मोर्चे रस्ता लोगो होत आहेत,त्यामुळे भविष्यकाळात याबाबतीत राज्यसरकार काय निर्णय घेते? हे बघणे उचित ठरेल.