जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज व्हनाळी,ता.कागल येथील विद्या मंदिर मध्ये,1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांच्या मध्ये,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत,पाककृती उपक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या.आज झालेल्या विद्या मंदिर व्हनाळी येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत पाककृती उपक्रम स्पर्धेचे उद्घाटन,व्हनाळी ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.सुधाकर पाटील,शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,बाबासो आगळे, यशवंत मेथे, प्रदीप जाधव,व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनिल पाटील यांनी विद्यामंदिर व्हनाळीच्या अध्यक्षांचे,सदस्यांचे व मातापालक वर्गाचे स्वागत केले.
व्हनाळी ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.सुधाकर पाटील यांनी,मुलांच्या माता पालकांना,गरोदरपणी दिल्या जाणाऱ्या आहाराविषयी सुंदर विवेचन करून मार्गदर्शन केले. त्याबरोबरच माता-पालकांनी आणलेल्या पाककृतींचे परीक्षण करून,माता पालकांची प्रशंसा केली.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धेमध्ये विजेते प्राप्त माता भगिनींचे व सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींचे अभिनंदन करण्यात आले.
आज विद्यामंदिर व्हनाळी येथे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत झालेल्या पोषणशक्ती निर्माण पाककृती स्पर्धेस,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका वर्ग,मदतनीस वर्ग,सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा माता भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या सुंदर रंगलेल्या अशा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती उपक्रम व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे, शेवटी आभार प्रदर्शन संदीप शितोळे सर यांनी केले असून, स्पर्धा अतिशय उत्साहात व आनंदात पार पडली.