- गोकुळ सर्वसाधारण सभेत सत्ताधारी- विरोधक आमने-सामने.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(नंदकुमार तेली)
नेहमीप्रमाणे गोकुळची सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली.सत्ताधारी विरोधक आमने-सामने आल्याने अपेक्षेप्रमाणे गोंधळ निर्माण होऊन सभा गुंडाळण्यात आली.विरोधक संचालकांनी प्रश्न विचारण्याची संधी न दिल्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी प्रश्न संचालकांनी नाही तर सभासदांनी विचारायचे असतात,असे समर्पक उत्तर दिले.व अहवाल वाचनास सुरुवात केली.
- वार्षिक भांडवलामध्ये पंधरा कोटी पेक्षा अधिक ची वाढ.!
अहवाल वाचन प्रास्ताविकात, अहवाल सालात संघाची वार्षिक उलाढाल 3428 इतकी असून गतवर्षीपेक्षा रुपये 499 कोटी ने जास्त असून भाग भांडवल 74 कोटी 26 लाख इतकी झाली आहे. वसूल भाग भांडवलामध्ये पंधरा कोटी नऊ लाख ने वाढ झाली आहे.अशी माहिती देण्यात आली.तसेच डीबेंचर्स, राखीव व इतर निधी, दुध दर, दूध दर फरक दुधाची गुंतवणूक आदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच उल्लेखनीय बाबींमध्ये गोकुळच्या वाशी पॅकिंग युनिटचे विस्तारीकरण, लंपी रोगाच्या अटकाव्यासाठी तातडीने केलेल्या उपाययोजना,कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना, स्लरी प्रक्रिया प्रकल्प,सॅटेलाईट डेअरी उदगाव पाणीपुरवठा योजना, आदींचा समावेश होता.
तसेच संकलन, वासाचे दूध, न्यू इंडिया इन्शुरन्स, बल्क मिल्क कूलर, पेट्रोल पंप, मोबाईल ॲप, सोशल मीडिया, मिल्को टेस्टर, भविष्य कल्याण योजना, दुग्ध शाळा, बाहेरील दूध रुपांतरीत, पुणे शाखेकडील पॅकिंग व्यवस्थेबाबत, मार्केटिंग, पेट बॉटलमध्ये गोकुळचे फ्लेवर्ड मिल्क, पशुखाद्य, प्रेग्नेंसी रेशन, जनावरांचे वंधत्व निवारण शिबिर, कृत्रिम रतन सेवेचे बळकटीकरण, आयुर्वेदिक औषध उपचार पद्धती, वैरण विकास योजना, सायलेज, फार्मर प्रोडूसर ऑर्गनायझेशन, वासरू संगोपन योजना व म्हैस खरेदी अनुदान आदिविषयी दूध संघाच्या केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच अनुदान,कामगार कल्याण मंडळ, सामाजिक बांधिलकी,आदी सामाजिक कार्य, तसेच वैधानिक लेखापरीक्षण व नफा विभागणी आदींची सविस्तर माहिती दिली.यावेळी विरोधी सभासद व संचालकांनी सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीत तफावत असल्याचा आक्षेप घेत विरोधात घोषणाबाजी केली.