जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील आटपाडीत,सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकत आहे, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आमचा प्रखर विरोध राहील.अंतरावली सराटी ता.अंबड जिल्हा जालना येथील अमानुष लाठी हल्ला झाला व गोळीबार करून आमच्या माता भगिनींवर सरकारने अत्याचार केला.त्यानंतर दोन युवकांनी आरक्षनासाठी आपला प्राण दिला आहें.तर वासनवडी बीड मधील महिलांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले. मात्र मराठा आरक्षणाच्या या संवेदनशील प्रश्नावर एकही मराठा खासदार - आमदार आपला निषेध व्यक्त करत नाहीं,एकही आमदार व खासदार राजीनामा देत नाही,ही लाजिरवाणी गोष्ट आहे,मराठा आरक्षणावर एक चकार शब्द काढत नाहीत, आमचा आमदारही आपली भूमिका मांडत नाही.
आजपर्यंत मराठ्यांना गृहीत धरून मतांसाठी गोरगरीब मराठा समाजातल्या तरुणांचा वापर करून घेतला जातोय,हे इथून पुढे होणार नाही मराठा आता जागा होतोय.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यांना बोलायला वेळ नाही.आणि हे सांगली लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर नैतिक जबाबदारी स्वीकारून भूमिका घेत नाहीत तो पर्यंत सर्व राजकीय नेत्यांना सकल मराठा समाज आटपाडीचा प्रखर विरोध राहणार आहे.
यावेळी ,तानाजी नांगरे पाटील,अनिल गायकवाड,मंगलनाथ देशमुख,राजेश जाधव,विकास देसाई,अतुल गायकवाड, प्रकाश गायकवाड,रणधीर देशमुख,शरद ढोकळे इतर समाज बांधव उपस्थित होते.