जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दि.११/९/२०२३ रोजी सांगली मिरज कुपवाड शहरातील सार्वजनिक गणेश उत्सवाकरीता शहरातील मंडळांच्या कमानी,गणपती मुर्ती विक्रीचे स्टॅाल व मंडळांचे स्टेजचे भाडेबाबत बैठक मा.आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांचे दालनात झाली.
महानगरपालिकेने निश्चित केलेले दर परवाडणारे नसल्याने शहरातील मंडळांचे प्रतिनिधी व मुर्ती विक्रेते यांचे शिष्टमंडळ पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष व पै.गौतम पवार माजी नगरसेवक यांचे उपस्थित मा.आयुक्त व प्रशासनाशी चर्चा केली.गणेशोत्सव,मोहरम व इद या सार्वजनिक उत्सवांकरीता नियमित भाड्याचे दर मंडपाकरीता रूपये १० /-प्रतिदिन प्रती स्के.फुट ऐवजी सरासरी रूपये ५ प्रती स्के.फुट एकरक्कमी,मंडळाच्या कमानीसाठी प्रती स्के.फुट २५ रूपये ऐवजी ५०००/- रूपये प्रती कमान एकरक्कमी व मुर्ती विक्रेत्यांकरीता १० रूपये प्रती स्के.फुट प्रती दिन ऐवजी ३०००/- प्रती स्टॅाल असे सुधारीत करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेश उत्सवात यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून मा.पृथ्विराज बाबा पाटील व पै.गौतम पवार यांचे शिष्टमंडळाने प्रशासनासोबत यशस्वी चर्चा करून यात मार्ग काढला असल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यामधून समाधानाचे वातावरण आहे.याबाबत मा.आयुक्त व प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले आहे .
शिष्टमंडळात गणेश मंडळांचे प्रफुल्ल पोतदार,विशाल वरे,अशोक गोसावी,विलास शिंदे,सनी धोतरे,प्रदीप कांबळे,अमित माने व शहरातील मुर्ती विक्रेते मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.या बैठकीत,हे आपण मा.आयुक्त सुनिल पवार,उपायुक्त राहुल रोकडे,मालमत्ता अधिक्षक नितिन काका शिंदे,आप्पा हालकुडे,व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.