सांगली रेल्वे स्थानकावर,खासदार संजय काका पाटील यांच्या केलेल्या प्रयत्नानी,नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्यामुळे,सांगली जिल्ह्याचा गुजरात राज्याशी संपर्क वाढला.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगली रेल्वे स्थानकावर,खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नांनी, नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्यामुळे,सांगली जिल्ह्याचा गुजरात राज्याशी संपर्क वाढला आहे.सांगली,मिरज मार्गे धावणारी कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस गाडी आता राजकोट पर्यंत विस्तारित करण्यात आली.सांगली, मिरज दोन्ही रेल्वे स्टेशनवर विस्तारित गाडी थांबणार आहे.या गाडीत सांगली रेल्वे स्टेशनला वाढीव तिकिटांचा कोटा मंजूर झाला आहे.

खासदार संजय काका पाटील यांच्या सातत्याच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी आता राजकोट पर्यंत पुढे विस्तारित करण्यात आलेली आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज या दोन्ही रेल्वे स्थानकांचा संपर्क गुजरात राज्याच्या चारही प्रमुख महानगरा सोबत जोडला गेला आहे.

कोल्हापूरहून सुटून ही गाडी मिरज सांगली उद्या सांगली जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनवर थांबेल.सांगली स्टेशनवरुन सुटून पुढे सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण(मुंबई), भिवंडी, वसई रोड(मुंबई), वापी, नवसारी, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद व विरमगाम येथे थांबून राजकोटला पोहोचेल.

राजकोट हून परत येतानाही रेल्वेगाडी विरमगाव जंक्शन मार्गे अहमदाबादला येईल.अहमदाबाद हुन पुढे नडियाद जंक्शन,आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी, वापी, वसई रोड (मुंबई), भिवंडी, कल्याण (मुंबई), लोणावळा, पुणे, सातारा येथे थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. सांगलीतून सुटून पुढे मिरज मार्गे ही गाडी कोल्हापूरला रवाना होईल.

ही गाडी राजकोट पर्यंत विस्तारित केल्याने जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी मध्ये काम करणार्या सांगली जिल्ह्यातील असंख्य लोकांची सोय होईल.तसेच राजकोटहून सांगलीला येणार-जाणारे व्यापारी व प्रसिद्ध तीर्थ स्थळ शंखेश्वर व विरपूर जाणार्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.ही गाडी अहमदाबाद येथे पोहोचून सुमारे 12 तास उभी राहून परत सांगली मार्गे कोल्हापूरला येत होती.त्यावेळेस ही गाडी पुढे राजकोट पर्यंत विस्तारित होईल अशी माहीती रेल राज्यमंत्री जगदीश यांनी ट्विटरवर दिली आहे.

सांगली चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष शरद शहा व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे उमेश शहा तसेच सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून कोल्हापूर-अहमदाबाद गाडी राजकोट पर्यंत विस्तार करण्याची मागणी केली होती.मिरज रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री सुकुमार पाटील यांनी देखील ही गडी राजकोट पर्यंत नेण्यासाठी पुणे विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती.त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांमार्फत ही गाडी राजकोट पर्यंत विस्तार करण्याची मागणी केली होती. तसेच सांगली रेल्वे स्टेशनला या गाडीला अतिरिक्त तिकिटांचा कोटा मंजूर करण्याची मागणी केली होती. खासदारांच्या या मागण्या आता मंजूर करण्यात आलेल्या असून सांगली जिल्ह्यातील सामान्य जनता व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top