जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शतकी महोत्सवी वर्षा निमित्य,"मुहूर्तमेढ शंभराव्या नाट्य संमेलनाची" या उपक्रमाची सुरुवात 5 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे रंगभूमीदिनी होणार आहे."मुहूर्तमेढ शंभराव्या नाट्यसंमेलनाची" या उपक्रमा अंतर्गत 5 नोव्हेंबर 2023 रोजी सांगली येथे विविध उपक्रमा द्वारे सुरुवात होऊन,महाराष्ट्र राज्यातल्या रंगकर्मीच्या वतीने विविध उपक्रम साजरे होणार आहेत.
आज सांगलीचे विद्यमान आमदार व उपक्रम स्वागत समितीचे अध्यक्ष सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून,या उपक्रमाची मुहूर्तमेढ सोहळ्यास 7 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता,सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात सुरुवात होणार आहे.या उपक्रमांतर्गत "चाणक्य" हा शैलेश दातार अनुवादित आणि अभिनीत प्रयोग सादर होणार असून,सांगलीत भावे नाट्यमंदिर येथे होणाऱ्या या सोहळ्यास राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,कार्यवाह अजित भुरे,खजिनदार सतीश लोटके,संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गजवी,तर शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आदी मान्यवर महोदय उपस्थित राहणार असून,महाराष्ट्र राज्यातील मोठ्या प्रमाणात रंगकर्मी व नाट्य रसिक उपस्थित राहणार आहेत.