जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात नेत्र दीपक कामगिरी केली असून,107 पदके मिळवण्याचा ऐतिहासिक विक्रम करत त्यात 28 सुवर्ण,38 रौप्य,41 ब्रांझ अशा पदकांचा समावेश आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 107 पदकांची कमाई करत भारताने अव्वल तिसऱ्या स्थानी क्रमांकावर येण्याची ऐतिहासिक नोंद केली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेच्यासाठी भारतातील खेळाडूंनी यंदाच्या वर्षी,कोणत्याही परिस्थितीत 100 पदकांच्यावर विजय प्राप्त करण्याचा संकल्प केला होता.
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांनी आज,विजेत्या पदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले असून, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे,आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील पदक प्राप्त खेळाडूंची संवाद साधणार आहेत. आज अखेरच्या दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धेत,भारतीय खेळाडूंनी 6 सुवर्ण, 4 रौप्य, 2 ब्रांझ अशी पदके मिळवून आत्तापर्यंत एकूण 107 पदकांची कमाई केली आहे.
दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनने 379 पदके मिळवून प्रथम क्रमांक,जपान व कोरिया अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील,आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ऐतिहासिक पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे.एकंदरीत अशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या खेळाडूंनी 107 पदकांची कमाई केली असल्याने, देशभरातून सर्वत्र सर्व खेळाडूंच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.