सांगलीत गट- क संवर्गातील पदांसाठी सरळ सेवा भरती परीक्षा केंद्राच्या ठिकाणी,कलम 144 लागू.-- अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती पाटील.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 सांगली जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधामणी,सांगली या परीक्षा केंद्रावर होणार आहे.परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती पाटील यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत  इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

 आदेशात म्हटले आहे,परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी/कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास,एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन,पब्लिक टेलिफोन बुथ,फॅक्स मशिन,ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल,पेजर,ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस,डिजिटल कॅमेरा,स्मार्ट वॉच,इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही,असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती पाटील यांनी जारी केले आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top