जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असून,धरणाची उंची 519.60 मीटर वरून 524.256 मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे.कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची जर उंची वाढवली तर,महाराष्ट्र राज्यातील विशेषतः 2 जिल्ह्यांना म्हणजे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा धोका संभवत आहे.कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या धोरणामुळे पाण्याचा फुगवटा म्हणजेच बॅक वॉटर वाढणार असून,त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संभावित 2 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा धोका उद्भवणार आहे.
कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने याबाबतीत नव्याने भूसंपादन करण्यासाठी सर्वेक्षण चालू असून,केंद्रीय जल आयोगाने ही कर्नाटक सरकारला धरणाची उंची वाढवण्याबाबत मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे.अलमट्टी धरणाची प्रस्तावित उंची वाढल्यामुळे,कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागास नव्याने भूसंपादन करावयास लागणार असून,भूसंपादनाच्या बाबतीत विरोध होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.अलमट्टी धरणाची प्रस्तावित उंची वाढवली गेली तर,सध्या पाणी साठवण्याची क्षमता 123 टीएमसी असून,ती 200 टीएमसी पर्यंत वाढणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर विशेषतः सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा धोका उद्भवणार असून,संबंधित दोन्हीही जिल्ह्यांनी 2019 व 2021 साली याचा अनुभव घेतला आहे.एकंदरीतच अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्याबद्दल महाराष्ट्र सरकार कोणता उचित निर्णय घेते?हे बघणे विशेषतः योग्य ठरेल.