जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्याची ओळख आजपर्यंत कला,क्रीडा,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रामध्ये प्राधान्याने घेतली जात आहे. पण यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे ती म्हणजे स्वच्छतेची.स्वच्छ भारत अभियान देशभर सुरू आहे पण त्या अभियानाची खऱ्या अर्थाने सांगलीमध्ये अमंलबजावणी होत आहे म्हणायला हरकत नाही.सांगलीची स्वच्छतेमध्ये आगळीवेगळी एक नवी ओळख निर्माण निर्माण करण्यासाठी राकेश दड्डणावर व त्यांचे सहकारी निर्धार फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.2000 व्या दिवशी धामणी चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
महाविद्यालयीन काळात एकीकडे तरूणाई भरकटत असताना अशा गोष्टींना फाटा देत सांगली शहरात 1 मे 2018 पासून राकेश दड्डणावर या 25 तील तरुणाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या स्वच्छता अभियानास नुकतेच 2000 दिवस पूर्ण झाले असून सर्वात जास्त दिवस न थांबता स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण व्यक्ती म्हणून राकेश दड्डणावर याच्या नांवाने इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जागतिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.सांगलीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
राकेश दड्डणावर म्हणाले की,स्वच्छ सांगली सुंदर सांगली हे वाक्य लहानपणापासून ऐकत होतो पण त्याला सत्यात साकारण्यासाठी एक निर्धार करून महाविद्यालयीन काळातच स्वच्छता अभियानास सुरूवात केली.स्वच्छता अभियान म्हणजे औपचारिकता समजली जात होती पण याला छेद देत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली.आधी स्वच्छता व त्यानंतर सुशोभीकरण यामुळे या मोहिमेत तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि मला खूप मोठं प्रोत्साहन मिळालं.कोणत्याही शासकीय मदतीशिवाय फक्त समाजातील दानशूर व्यक्तींकडून वस्तू स्वरूपात घेतलेल्या मदतीच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे.सेल्फी पाँइंट,पंढरपूर वारी काळातील काम आणि महापूर ओसरल्यानंतरची स्वच्छता 2019-21 आदिंमुळे खऱ्या अर्थाने ही मोहीम सुरू केल्याचं समाधान मिळालं.जागतिक विक्रम ही बाब प्राथमिक पातळीवर समाधानकारक आहे परंतु नागरिकांच्या मनामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊन परीवर्तन घडणं आमचं अंतिम ध्येय आहे यासाठी आणखी जोमाने काम करीत राहू. निर्धार फाउंडेशनच्या राकेश दड्डणावर यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आजपर्यंत केलेल्या स्वच्छतेच्या अभियानाच्या कार्याबद्दल कौतुक करावे तितके थोडे आहे.आज पर्यंत निर्धार फाउंडेशनच्या राकेश दड्डणावर सहित सर्व कार्यकर्त्यांचे, बऱ्याच कार्यक्रमात,स्वच्छता अभियानाच्या कार्याबद्दल, राज्यात विविध ठिकाणी जाहीर कार्यक्रमाद्वारे सत्कार व कोड कौतुक केले आहे.महाराष्ट्र शासनाने देखील निर्धार फाउंडेशनच्या राकेश दड्डणावर यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वच्छता अभियानाच्या कार्याची दखल घेतली आहे.
यावेळी भारत जाधव,सतिश कट्टीमणी,अनिरुद्ध कुंभार,मानस शंभू,मनोज नाटेकर आदींसह स्वच्छतादूत उपस्थित होते.