जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पंढरपूर मध्ये संत गजानन भक्त परिवार महा पारायण समितीच्या वतीने,दि. 28 जानेवारी 2023 वार रविवार पासून, "श्री गजानन विजय ग्रंथाचे भव्य महापारायण सोहळा" आयोजित केला असून,या भव्य महापारायण सोहळ्यासंबंधी संपूर्ण माहिती भक्तांसाठी खाली देत आहोत.
दि. - 28 जानेवारी 2024, रविवार.
वेळ - सकाळी 7 वाजता.
पारायण स्थळ - पालखी तळ सोलापूर रोड पंढरपूर (65 एकर जागा ).
पारायण भक्तसंख्या - 11000.
महापारायणा नंतर लगेच आरती व महाप्रसाद
(1) महापारायणामध्ये प्रत्येक भक्ताने पूर्ण श्रद्धेने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे आहे.
(2) स्वतः चा श्री गजानन विजय ग्रंथ सोबत आणायचा आहे.
(3) महापारायणादरम्यान मध्ये एकदा फराळ व चहापानासाठी विश्रांती (ब्रेक) राहिल.
(4) भक्तांनी प्रवासखर्च व तेथे राहण्याची व्यवस्था स्वतः करायची आहे.मात्र योग्य दरात पंढरपूर येथे राहण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी महापारायण समितीचे स्वयंसेवक आपल्याला माहिती देतील व मदत करतील.
(4) पारायण सकाळी 7 ला सुरू होत असल्यामुळे भक्तांनी साडेसहा पर्यंत पारायण स्थळी येऊन आपले स्थान ग्रहण करणे अपेक्षित आहे त्यामुळे भक्तांना पंढरपूर येथे एक दिवस आधी म्हणजेच 27 जानेवारी 2024 च्या सायंकाळपर्यंत पोहोचावे लागेल त्यादृष्टीने लागणारे प्रवासाचे आरक्षण आतापासून करून ठेवावे.
(5) मध्यंतरात फराळ आणि चहापाण्याचीी व्यवस्था तसेच महापारायण आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.
(6) हे महापारायण अतिशय भव्यदिव्य,एकदम शिस्तीत व्हावे यासाठी प्रत्येक गजानन महाराज भक्तांची सहकार्याची अपेक्षा आहे.
करिता ज्या भक्तांना महापारायणात वाचन करण्यासाठी सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. भक्तांची संख्या मर्यादीत असल्यामुळे जो प्रथम नोंदणी करेल त्याला संधी मिळेल.
महापारायणा संबधी माहिती वेळोवेळी ह्या ग्रुपवर पोस्ट केली जाईल.ती नियमित वाचत जाणे.काही शंका असल्यास मला सायंकाळी 5 - 6 दरम्यान फक्त फोन करावा. What's up मेसेजला उत्तर देणे शक्य होणार नाही.
हा ग्रुप जॉईन केल्यानंतर लगेच नांव,गाव व जिल्हा असा परिचय द्यावा.जे भक्त परिचय देणार नाहीत त्यांची नोंदणी होऊ शकणार नाही.
ज्या भक्तांना महापारायणात भाग घेण्याची इच्छा आहे,फक्त अशाच भक्तांनी नोंदणी करून,खालील लिंक वर ग्रुप जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/Jd9OIK4ziuK5JjRbzK4Rc9