जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नांदेड मधील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांची संख्या आता 31 वर पोहोचली असून,त्यामध्ये 16 नवजात शिशुंचा समावेश आहे. सदरहू घटनेची केंद्र सरकारने देखील दखल घेतली असून, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ,जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज रुग्णालयात जाऊन,संपूर्ण घटनेची माहिती घेतली.नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील झालेल्या गंभीर घटनेनंतर,राज्य सरकारवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींनी टिकेची झोड उठवली आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन,चौकशीच्या सूचना केल्या असून, चौकशी समिती आज दाखल झाली आहे.चौकशी समितीत घाटी रुग्णालयातील डॉ.भारत चव्हाण, डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ.शुभांगी जोशी आदींचा समावेश आहे.डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस.आर.वाकोडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर समितीने चर्चा केली आहे. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नेमकी कोणती कारणे आहेत? हे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाल्यावर,बोलणे उचित ठरेल असे वाटते.एकंदरीत राज्याच्या आरोग्य खात्याच्या विभागावर, सर्वत्र टीका होताना दिसत असून,याबाबतीत राज्य शासनाने समितीच्या अहवालानंतर,योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दिसत आहे.