जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर,लडाख स्वायत्त परिषदेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून,या निवडणुकीत भाजपचा पराभव दिसत आहे,तसेच केंद्रशासित पहिल्यांदाच होत असलेल्या लडाख स्वायत्त परिषदेच्या 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर 2023 रोजी मतदान पार पडले होते.
आज झालेल्या मतमोजणीच्या गिनतीनुसार 22 जागांचे निकाल जाहीर झाले असून,त्यामध्ये काँग्रेसचे 8 उमेदवार, नॅशनल कॉन्फरन्सचे 11 उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार विजयी झाले असून,1 जागेवर मात्र अपक्ष उमेदवाराने विजय प्राप्त केला आहे.जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 377 रद्द झाल्यानंतर,पहिल्यांदाच लडाख स्वायत्त परिषदेची निवडणूक पार पडली आहे.
दरम्यान कारगिल मध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस या पक्षांना विजय मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे,पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख नेत्या महबूबा मुक्ती यांनी म्हटले असल्याचे वृत्त आहे.काँग्रेसने देखील झालेल्या निवडणुकीच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून मतदारांचे आभार मानले आहेत.शिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे अमर अब्दुल्ला यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाबद्दल उमेदवारांचे अभिनंदन करून,मतदारां प्रति आभार व्यक्त केले आहेत.