जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, खरीप हंगामासाठी,पहिल्या टप्प्यात जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमधील तालुक्यात खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, त्यासाठी आज खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यासाठी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात मंजुरी देण्यात आली आहे.सदरहू 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीग्रस्त म्हणून,2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत करण्याचा निर्णय,आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील यापूर्वी शेतजमिनीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना, 2 हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती.त्यामुळे फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळत होती.आता मात्र 3 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रापर्यंत,भूधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.एकंदरीत आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे,राज्यातील शेतकरी बांधवांनी स्वागत केले असून,शेतकरी बांधवांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.