जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशात झालेल्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते,जवळपास 51 हजार युवकांना नियुक्ती पत्राचे वाटप झाले आहे.देश सध्या प्रत्येक क्षेत्रात अविरत कार्य प्रगती करत असून,देशभरातील तरुणांना रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत,असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देऊन,राष्ट्र उभारणीच्या विकासात त्यांचे योगदान फार महत्त्वाचे असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील सरकारी नोकरीत देखील,नोकर भरतीची प्रक्रिया सुटसुटीत केली असून,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वेळेत बचत होत असल्याचे दिसून आले आहे.देशातील सर्वच क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास,केंद्र सरकारचे प्राधान्य असून,सरकारी नोकरी मिळवणाऱ्या तरुणींचे विशेष कौतुकही,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील ऊर्जा,संरक्षण,पर्यटन,अंतराळ,खादी- ग्रामोद्योग क्षेत्रात देखील,देशातील युवकांचे योगदान फार मोठे असून देशातील युवक खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचवण्याचे कार्य केले असून,जागतिक स्तरावर कामगिरी केलेल्या देशातील खेळाडूंची त्यांनी प्रशंसा केली.देशात सध्या क्रीडा क्षेत्रात अत्यंत अनुकूल असे वातावरण तयार होत असून,त्यांनी देशातील कौशल्याने विकाससाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.देशातील सध्या वैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी अशा शैक्षणिक संस्थांमधून,कोट्यावधी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळत असून,जवळपास 37 ठिकाणी आज ,देशात रोजगार मिळावे आयोजित केले होते. देशातील रेल्वे,टपाल,गृह महसूल,उच्च शिक्षण विभाग येथे आज नियुक्तीपत्रे देण्यात आलेले युवक रुजू होतील.महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते नियुक्तीपत्रे युवकांना देण्यात आली.महाराष्ट्र राज्यात पुण्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,नांदेड मध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड नागपूर मध्ये केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते,नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.