जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारताने चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत,आज 30 पदके मिळवून एकूण 64 पदकांची प्राप्ती केली आहे.भारताने चीनमध्ये पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत जवळपास 15 सुवर्ण,20 रौप्य आणि 29 पदकांची लयलूट करत,एकूण 64 पदके मिळवली आहेत.
आज भारताच्या निमिषा सुरेश याने T-47 लांब उडी गटात, अंकुर धामनं पुरुषांच्या 1500 मिटर T-11लांब उडी गटात, महिलांच्या रक्षिता राजूने 1500 मीटरच्या T-13 स्पर्धेत तसेच भालाफेक F- 37/ 38 प्रकारात सुवर्णपदक मिळवले. भारताच्या सुंदरसिंग गुजरने सुवर्ण,रिंकूने रौप्य व अजित सिंग याने कास्यपदकं भालाफेक F-46 स्पर्धेत मिळवली.भारताच्या सुमित अंतिलनं F- 64 भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले,तर पुष्पेन्द्र सिंगने कास्यपदक पटकावले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार,दैदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल,भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.एकंदरीत भारताने चीनमधील झालेला पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत 64 पदकांची लयलुट करत आपला करिष्मा कायम ठेवला आहे.