जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पश्चिम बंगाल सरकारला सिंगूर नॅनो प्रकल्पा प्रकरणी टाटा मोटर्सला,जवळपास 766 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.टाटा मोटर्स ने पश्चिम बंगाल सरकार विरोधात नुकसान भरपाई चा दावा दाखल केला होता.त्याचा आज लवाद न्यायाधिकरणाने सुनावणीनंतर निकाल दिला असून,टाटा मोटर्सला सिंगूर नॅनो प्रकल्पाच्या नुकसान भरपाई पोटी 766 कोटी द्यावेत असा आदेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी टाटा मोटर्सने, नॅनो कार उत्पादनासाठी प्रकल्प उभा करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली होती.परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे व झालेल्या प्रचंड परिसरातील रोषामुळे,टाटा मोटर्सला नॅनो कार प्रकल्प गुंडाळावा लागला होता.टाटा मोटर्सने लवाद न्यायाधिकरणात नुकसान भरपाई साठी दावा केला होता.त्या दाव्याचा निकाल लागून,पश्चिम बंगाल सरकारने टाटा मोटर्स ला सिंगूर नॅनो प्रकल्पाच्या नुकसान भरपाई प्रकरणी,766 कोटी रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.