जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज लखनौ मध्ये आयसीसी एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि गतविजेत्या इंग्लंडमध्ये सामन्याचा थरार रंगणार असून,दुपारी 2:00 वाजता लखनौ येथे होणार आहे.भारतीय संघाचे सध्याच्या घडामोडीत,सलग 5 सामन्यात विजय झाले असून,इंग्लंड मात्र पराभवाच्या गर्तेत सापडल्याचे दिसत आहे. सध्या परिस्थितीत इंग्लंडचा खेळ विश्वचषक स्पर्धेत अत्यंत सुमार झाला असून,तरीदेखील त्या संघात कमी लेखणे हे धोक्याचे ठरेल!असे सध्या तरी वाटते आहे.कारण क्रिकेटच्या सामन्याच्या जगात,कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते हे यापूर्वी क्रिकेट रसिकांना माहिती आहे.काल धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने न्युझीलंड वर 5 धावांनी विजय मिळवला असून,न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले होते.ऑस्ट्रेलियन संघाने न्युझीलंड संघासमोर 389 धावांचं आव्हान उभे केले होते.मात्र न्युझीलंड चा संपूर्ण संघ 50 षटकात 9 बाद 383 धावावर आटोपला.
भारतीय क्रिकेट संघाची जमेची बाजू म्हणजे 5 वेगवेगळ्या शहरातील खेळपट्ट्यांवर,भारतीय संघाने सरस कामगिरी करून विजय प्राप्त केले आहेत,ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.दरम्यान लखनौच्या खेळपट्टीवर,खेळपट्टी चांगली असल्याने व कोरडी हवा असल्याने,सामन्यावर फार मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे.त्यामुळे सध्या परिस्थितीत भारतीय संघ प्रथम नाणेफेक जिंकल्यावर,पहिली फलंदाजी स्वीकारून,मोठ्या धावसंख्येच्या डोंगर उभारणीत असल्याचे दिसत आहे.एकंदरीतच भारतीय संघ लखनौमध्ये नबाब होणार का नाही? व सलग सहावा विजय प्राप्त करणार की नाही? याकडे देशातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.