जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात आज यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या अगोदर महापालिका प्रशासनाने,करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात,अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली असून,अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा भिंतीच्या परिसरातील चप्पल स्टॅन्ड ठेवण्याची दुकाने,महापालिकेकडून हटवण्यात येत आहेत.दरम्यान महापालिका प्रशासनाने राबवलेल्या अतिक्रमण खटाव मोहिमेस,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात आला असून,चप्पल स्टॅन्ड दुकानधारकांनीही तीव्र विरोध केला आहे.
कोल्हापुरात आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात, कोल्हापूर महानगरपालिकेकडून राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे,मंदिर परिसराच्या आसपास दुकानधारक व प्रशासन याच्यामध्ये वादविवादाच्या चकमकी पहावयास मिळाल्या. दुकानधारकांच्या मते,महापालिकेने पाठवलेल्या नोटीसीच्या मुदतीस अजून 2 दिवस बाकी असताना,त्या मुदतीच्या आतच कारवाई होत असल्याचा आरोप चप्पल स्टॅन्ड दुकान धारकांनी केला आहे. कोल्हापूर मंदिर परिसरातील चप्पल स्टॅन्ड दुकानदारकांच्या महिला देखील यावेळी पुढे आल्याचे दिसून आले असून,पोलिसांशी वादावादी होत असल्याचे चित्र दिसले आहे.एकंदरीतच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्याकडून राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे,परिसरात काही वेळ वातावरण तणावाचे निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.