जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
छत्रपती संभाजीनगर येथे प्रदेश काँग्रेसच्या विभागीय बैठकीत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 9 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्वोच्च व्यासपीठाने केलेल्या ठरावा नुसार,50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून,संसदेद्वारे कायदा करून देशातील SEBC वर्गाला आरक्षण देण्यात यावे असा ठराव मंजूर केल्याबद्दल,अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचा व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा अभिनंदनचा ठराव पारित केला आहे.छत्रपती संभाजी नगर येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या विभागीय बैठकीत,काँग्रेस वर्किंग कमिटीचा व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा अभिनंदनचा ठराव,काँग्रेस राज्य प्रवक्ते डॉ.संजय लाखे- पाटील यांनी मांडून,नंतर ठराव एकमताने संमत होऊन,यासाठी गेले 2 वर्षाहून अधिक काळ काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी मागणी रेटून धरली होती याचा उल्लेख विशद केला.
अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार जर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द झाली किंवा शिथिल झाली तर,मराठा ओबीसींसह देशभरातील अनेक सामाजिक आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागतील असे म्हटले आहे.एकंदरीतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 9 ऑक्टोबर 2023 च्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या ठरावानुसार,देशाच्या सर्वोच्च संसदेत जर कायदा केला गेला तर,देशातील देशातील SEBC वर्गाला तसेच इतर वर्गांना देखील आरक्षण देण्याचा मार्ग सुकर होईल असे वाटते.