जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सध्या वाघनखं ह्या विषयावर खूप ऐकू येतंय.आणि महाराजांची मूळ वाघनखं परत येतायत हे वाचून फारच समाधान वाटले.पण ही एव्हढी गाजलेली वाघनखं म्हणजे काय प्रकार होता हे सांगण्यासाठी,ही सोबतच्या चित्रांत दिसणारी वस्तू म्हणजे वाघ नखे असून,ती शिव कालीन आहेत. त्याचा प्रताप व परिणाम आपल्याला चांगलाच माहिती आहे .
अफजलखान व शिवाजी महाराज भेट ह्या वाघ नखामुळे जगभर गाजलेली आहे.वस्तुतः महाराजानी खानावर प्रथम वार केला नव्हता.पण खानाच्या नीच हेतुची माहिती असल्यामुळे त्यानी संपूर्ण तयारी केली होती.पोषाखाच्या आतून जिरेटोप व चिलखत घालून कवच केले होते.आता आपण परत आपल्या वाघनखाकडे येऊ.तुम्ही चित्र नीट पाहिल्यास लक्षात येईल की वरून ही वाघ नखे दिसतच नाहीत फक्त अंगठया घातल्यासारखं दिसते.
आता जरी ती जुनाट दिसत असली पूर्वीच्या काळी त्यावर सोने हिरे व खडे बसवलेले असत.आतून त्याचे पोलादी J सारखे hooks आत वळलेले असतात.जेव्हा ती ताकदीने पोटात घुसवली जातात आणि बाहेर ओढली जातात तेव्हा ही वाघनखे पोटातली सगळी assembly घेऊन बाहेर पडतात. ही वाघनखे वापरण्यासाठी कमालीची ताकद लागते.मनगट.. बाजू व खांदे हे प्रचंड मजबूत असावे लागतात तरच त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होतो. तेंव्हा विचार करा महाराजांची अंगकाठी लहान असली तरी हातात किती ताकद असेल? तेही अफजलखान सारख्या अफाट ताकदीच्या माणसाला मारणे ...केव्हढी मानसिक व शारीरिक ताकद असेल..?
एकतर ती NOW OR NEVER अशी परिस्थिती होती.जेंव्हा खानाने महाराजांना मिठी मारली व त्यांचे डोके बगलेत दाबून डोक्यावर कट्यारीचा वार केला पण जिरेटोप (एक प्रकारचे शिरस्त्राण)व चिलखत असल्यामुळे कट्यार फक्त खरखरली तरी महाराजांना टाळू जवळ ओझरती जखम झालीच. हा प्रकार घडल्याबरोबर महाराजानी आपल्या हातातली वाघनखे संपूर्ण ताकदीने खानाच्या पोटात घुसवली व तशीच ताकदीने बाहेर ओढली. वाघनखानी आपले काम चोख बजावले. खानाची आतडी बाहेर आली. खान दोन्ही हातानी आतडी सावरीत बाहेर पळू लागला ...पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे .जिवा महाला ने सय्यद बंडा ला तलवार उगारून येताना पाहिले व लगेच बैठक घेऊन ( हातात पट्टा म्हणजे लपकणारी लवचिक सात आठ फूट लांबीची तलवार)पट्ट्याच्या एकाच वारात खाँद्यापासुन उभे दोन तुकडे केले. त्याला पट्टा उतरवणे म्हणतात ...इकडे आपल्याच हाताने आपली आतडी पोटात कोंबून पालखीत बसून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या खानाचे मुंडके संभाजी कावजीने कापले व भाल्यावर लावून तो प्रतापगडावर निघून गेला.महाराज अगोदरच गडावर पोचले होते. फक्त वाघ नखामुळे हे सर्व पूर्णत्वास आले.
ही वाघ नखांची माहिती उमेश पटवर्धन व छायाचित्र श्री. प्रकाश पुरवार यांचे कडून संपादित करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.