कोल्हापुरात मंगळवारी शाही दसऱ्याची मिरवणूक,पारंपारिक शाही लवाजम्यासह निघणार.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापुरात मंगळवारी शाही दसऱ्याची मिरवणूक पारंपारिक लावाजव्यासह निघणार असून,महाराष्ट्र शासनाकडून कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे,यंदाची मिरवणूक ही जागतिक स्तरापर्यंत  पोहोचवावी असे कार्यक्रमाचे नियोजन आहे.कोल्हापुरातील शाही दसऱ्याची मिरवणूक,नवा राजवाडा ते दसरा चौक, भवानी मंडप ते दसरा चौक,या मार्गावर निघणार असून,शाही दसरा मेळाव्याची मिरवणूक,सिमोलंघन सोहळ्यास, कोल्हापूरकर शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 कोल्हापुरातील भवानी मंडपापासून श्री अंबाबाई देवीची पालखी,गुरु महाराजांची पालखी,छत्रपती देवस्थानची पालखी ही पारंपारिक लवाजम्यासह निघणार असून,त्यामध्ये ध्वजवाहक घोडा,10 घोड्यांचे पथक,2 हत्ती,1बग्गी,30 मावळ्यांचे पथक,60 खेळाडूंचे पथक,200 पैलवान व यानंतर तिन्ही पालख्या असणार असून,त्याबरोबरच ढोल पथके, लेझीम पथके,धनगरी ढोल पथके आदी पथके पारंपारिक लवाज्यासह मिरवणुकीत सहभागी असतील.नवा राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर,एन.सी.सी.व एन.एस.एस काऊट चे 2500 विद्यार्थी जवळपास स्वागत स्वागताला उभारणार असून,शाही मिरवणुकीचा मार्ग,सडा,रांगोळ्या,रंगीबेरंगी फुले आदींनी सजवण्यात येणार आहे. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराजांचे स्वागत करवीर नागरिक व पर्यटक करणार असून,त्यासाठी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर 12 भव्य कमानी उभारल्या गेल्या आहेत. 

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव दि.15 पासून 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत,सांस्कृतिक,कला,क्रीडा क्षेत्राने गाजत असून, मंगळवार दि.24 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्याच्या दिवशी, राजेशाही थाटात सिमोलंघन सोहळा संपन्न होणार आहे. कोल्हापुरातील भवानी मंडपातून 4:30 वाजता,मिरवणूकीस सुरुवात होणार असून,राजवाडा येथून निघालेली शाही दसरा मिरवणूक,दसरा चौकात पोहोचणार आहे.दसरा चौकात छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होऊन, सोने लुटून,सिमोलंघन होऊन,दसऱ्याच्या शाही मिरवणुकीची सांगता होणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top