जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे आणखी एक पुरोगामी विषयावरील लक्षवेधी कथानक – ‘काव्या –एक जज्बा, एक जुनून’.दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत काव्या (सुम्बुल तौकीर खान) या IAS अधिकारी महिलेची प्रेरणादायक कहाणी सांगितली आहे, जिचा उद्देश सामान्य माणसाचे भले करून देशाची सेवा करणे हा आहे.काव्या एक निग्रही, निडर मुलगी आहे. व्यावसायिक जीवन असो की खाजगी, ती स्वतःला झोकून देऊन काम करते.
या वेधक कथानकात टेलिव्हिजन क्षेत्रातील एक अष्टपैलू अभिनेता विनय जैन एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे.काव्याचा मार्गदर्शक आणि शुभमचा (अनुज सुलेरे) पिता–जयदीप ठाकूर ही व्यक्तिरेखा विनय जैनने साकारली आहे.जयदीप एक अनेक पदर असलेले व्यक्तिमत्त्व आहे असे या भूमिकेचे वर्णन करून विनय जैन म्हणतो, “काव्याचा मार्गदर्शक म्हणून त्याला तिच्या कर्तृत्वाचा रास्त अभिमान आहे.पण रक्ताची नाती नेहमी इतर कोणत्याही नात्यापेक्षा अधिक घट्ट असतात.त्यामुळे एक पिता या नात्याने आपल्या मुलांचे यश आणि त्याचे कल्याण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच आहे,कारण काव्या आपले IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण करते,पण त्याचा स्वतःचा मुलगा शुभम मात्र त्या परीक्षेत अपयशी ठरतो.या परिस्थितीमुळे वैतागलेला जयदीप काव्याला ‘गुरु दक्षिणेच्या’ रूपात IAS बनण्याची तिची आकांक्षा एक वर्ष लांबणीवर टाकण्याची तिला विनंती करतो.संपूर्ण मालिकेत,प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या जयदीपच्या व्यक्तिमत्त्वातील नानाविध पैलू बघतील, ज्यामधून या व्यक्तिरेखेतील गहिरेपण प्रेक्षकांपुढे उलगडत जाईल.”