कागल बस स्थानकाजवळ पिलरच्या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू.-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही.!

0

 - कराडसारखा लांब,रुंद व उंच पूल होण्यासाठी आग्रही.

      जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

      (अजित निंबाळकर)

 राष्ट्रीय महामार्गावर कागल बसस्थानकाजवळ कराडसारखा लांब, रुंद पिलरचा उंच पूल गरजेचा आहे.त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच भेटू,अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणातील समस्या व अडीअडचणी संदर्भात लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक कागल विश्रामगृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले,कागल बसस्थानकाजवळ भुयारी पुलाऐवजी लांब,रुंद व ऊंच पिलरचा पूल झाला पाहिजे,कारण राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेला कागल हे मुख्य शहर आहे.५० हजारावर लोकसंख्या एका बाजूला राहते.तसेच, निपाणीकडून येणारी वाहतूक आणि पश्चिमेकडील गावांमधून कागलमध्ये येण्यासाठी व कागलमधून कोल्हापूरकडे जाण्यासाठी हाच एकमेव मुख्य मार्ग आहे.

 यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील,केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर,संजय ठाणेकर, नितीन दिंडे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, ॲड.संग्राम गुरव, संग्राम लाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, उपव्यवस्थापक गोविंद बैरवा,उप अभियंता सी.बी.भर्डे, सीईजीचे टीम लीडर मिलिंद श्रीराव,सीईजीआरएलचे टीम लीडर राम चौधरी,जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी यशोदीप पोळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top