जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबईत रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या हात गाड्या येत्या काही काळात बंद करून,त्या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या ढकल गाड्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट,झव्हेरी बाजार या भागात भागात सध्या फार मोठ्या प्रमाणात,हात गाड्या रस्त्यावर दिसत असून,ह्या गाड्यांच्या ऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ढकल गाड्या देता येतील का ? याची सध्या अजमावणी करण्यात येत आहे.
शासनाकडून सध्या आयआयटी सारख्या संस्थेची मदत देखील यासाठी घेण्यात येत असून,काळबादेवी,क्रॉफर्ड मार्केट, मुंबादेवी,झव्हेरी बाजार इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामानांची ने-आण करण्यासाठी,लहान मोठ्या हात गाड्यांचा वापर सध्या सुरू असून,त्यामुळे मुंबई शहरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.मुंबईतील महानगरपालिकेतील मुख्यालयात आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.मुंबईतील सध्यपरिस्थितीत हात गाडी चा वापर फार मोठ्या प्रमाणात होत असून,बॅटरीवर चालणाऱ्या ढकल गाड्यांची निर्मिती यशस्वी झाली तर,वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली असून,त्या संदर्भात पुढील काही योजना कशी करता येईल?याची चाचणी सुरू आहे.